रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2024 (12:40 IST)

Human Finger In Ice Cream in Mumbai डॉक्टरांनी आईस्क्रीम ऑर्डर केली, पॅकिंग उघडले तेव्हा एक मानवी बोट सापडले

Human Finger In Ice Cream in Mumbai मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका डॉक्टरने ऑनलाइन होम डिलिव्हरी ॲपद्वारे आईस्क्रीम खाण्यासाठी ऑर्डर केली, परंतु जेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली तेव्हा त्यात मानवी बोट दिसले. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि बोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले.
 
मुंबईतील मलाड भागात राहणारे 27 वर्षीय डॉ. ऑर्लेम ब्रेंडन सेराओ यांनी गेल्या बुधवारी झेप्टो डिलिव्हरी ॲपवरून कोन आइस्क्रीमची ऑर्डर दिली. आइस्क्रीमचे नाव Yummo butterscotch आहे. त्यानंतर काही वेळाने डिलिव्हरी बॉयने त्यांना त्यांचे पॅकेज दिले, त्यानंतर त्यांनी मोठ्या उत्साहाने आईस्क्रीम खायला सुरुवात केली, मात्र त्यांना धक्काच बसला. आईस्क्रीमच्या आत त्यांना मानवी विच्छेदित बोट सापडले जे सुमारे 2 सेंटीमीटर लांब होते.
 
बहिणीने ऑर्डर दिली होती
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला आईस्क्रीममध्ये बोट सापडले ते व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहे. त्यांची बहीण घरासाठी किराणा सामानाची ऑर्डर देत असताना, त्यांनी आपल्या बहिणीला आईस्क्रीम मागवण्यास सांगितले. सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबईतील मलाड पोलीस ठाण्यात तपास सुरू करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी पुढे सांगितले की, हे आइस्क्रीम कोठून बनवले गेले याचाही तपास पोलिस करणार आहेत जेणेकरून ते नेमके कोणाचे बोट होते याची खातरजमा होईल. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून बोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.