शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (08:26 IST)

आज बाळासाहेब असते तर...

raj thackeray
गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती आणि राजकारणावरुन खोचक टीकाही केली.
 
आज बाळासाहेब अससते तर...
राज ठाकरे म्हणाले, 'आज जी परिस्थिती झालीये, ती बाळासाहेब असते तर होऊ दिली नसती. सहानभुती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं आणि रडगाण सांगत बसायचं. स्वतः काय शेण खाल्लं...? मागच्या काही गोष्टी मला तुम्हाला परत सांगायच्या आहेत. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. महाराष्ट्रातल्या मतदारांनी आता विचार करण्याची गरज आहे. तुम्ही मतदान करणार आणि हे यांचा खेळ करत बसणार. 2019 ची निवडणूक झआली आणि त्यानंतर उद्ध ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली. अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली. चार भिंतींमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले. मग खुल्या स्टेजवर तुम्ही काहीच का बोलला नाहीत? तुम्हाला समजलं की, आमच्याशिवाय यांना सरकार स्थापन करता येणार नाही, त्यानंतर तुम्ही अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली.'
Edited by : Ratnadeep Ranshoor