गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 4 मे 2022 (19:11 IST)

संदिप देशपांडेच्या अडचणीत वाढ;गुन्हा दाखल

sandeep deshpande
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता आजपासून राज्यभरातील मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.मनसे अध्यक्षांनी इशारा दिल्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मशिदी समोर लाऊडस्पीकरवर अजान झाल्यास हनुमान चालीसा लावण्यासाठी मनसे कार्यकर्ता सज्ज आहे.  या पार्श्ववभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सकाळी शिवतीर्था बाहेर संदीप यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आलें होते. पण या दरम्यान संदीप देशपांडे हे पोलिसांसमोरच गाडीत बसून पळून गेले. या वेळी झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलें असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
या प्रकरणाची दखल घेत राज्याच्या गृहमंत्रालयाने देशपांडे यांच्यावर मुंबई दलातील महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीमुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.