शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (11:15 IST)

कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी गृहराज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आज (7 जुलै ) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
 
कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज होते. तसंच 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस आणि प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
 
मुंबईत उत्तर भारतीयांचा एक प्रमुख चेहरा भाजपमध्ये जाणार असल्याने यामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह हे मुंबईत एकेकाळी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. कलिना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.