शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (16:37 IST)

मुंबईतील बोरिवलीमध्ये एका वकिलावर तलवारीनं जीवघेणा हल्ला करण्यात आला

मुंबईतील बोरिवलीमध्ये भररस्त्यात एका वकिलावर तलवारीनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्व थरार परिसरातील एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. 
 
सत्यदेव जोशी असं गंभीर जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. बोरिवलीच्या एमएचबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 जुलै रोजी ही घटना घडली होती. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध 307, 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.