Daily Horoscope
✕

७ महानगरपालिकांना पुन्हा लॉकडाऊन लागू

Updated: गुरूवार, 2 जुलै 2020 (16:48 IST)
 
पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेल्या भागात संपूर्ण ठाणे जिल्हा, ज्यात ६ महानगर पालिकांचा समावेश आहे, आणि पनवेल महानगर पालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात नवी मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केला आहे, तर पनवेल महानगर पालिका आणि जवळच्या उरण तालुक्यात देखील शुक्रवारपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. उल्हासनगरने देखील गुरुवारपासून लॉकडाऊन लागू केला आहे. कल्याण डोंबिवली आणि खुद्द ठाणे महानगर पालिकेने देखील गुरुवारपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. मीरा भाईंदर महानगर पालिकेने तर बुधवारपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर या सर्वच भागामध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
वसई-विरार महानगर पालिकेच्या १८ भागांमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. तर वाशी एपीएमसी मार्केट आणि ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल एरिया लॉकडाऊनच्या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून एकट्या ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत बुधवारी दिवसभरात १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ३२२ इतका झाला आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

स्पोर्टी लूक अन् धांसू रेंज! हीरोची नवी 'Vida VXZ' इलेक्ट्रिक बाईकचा जलवा; पाहा फोटो!

दाराची बेल वाजली अन् 'लड्डू' उडून गेला! बेपत्ता पोपटासाठी मालकिणीकडून १ लाखांचे बक्षीस

भाजी मंडीत फॅशन शो, हातात मुळे आणि गाजरं घेऊन 'रॅम्प वॉक' करताना दिसले मॉडेल्स! व्हिडिओ पहा

"सुप्रिया आता तयार आहे; दोघे मिळून देश सांभाळू" मोदींच्या विधानावर शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर

यवतमाळमध्ये कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; १९,७९९ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५.८२ कोटी रुपये जमा

पुढील लेख
Show comments