बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (20:19 IST)

मुंबई बोट दुर्घटनेत शहीद झालेले नौदलाचे कमांडो महेंद्रसिंग राजपूत दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते

Mumbai Boat Accident: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा दरम्यान झालेल्या भीषण बोट अपघातात राजस्थानच्या रेनवाल तहसीलच्या जुन्सिया गावचे रहिवासी महेंद्रसिंग राजपूत शहीद झाले. तसेच महेंद्रसिंग हे भारतीय नौदलात कमांडो म्हणून कार्यरत होते आणि दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यांचे वय 34 वर्षे होते. या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी नीलकमल नावाची बोट गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात असताना हा अपघात झाला. नौदलाच्या जहाजाला धडकून ही बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत महेंद्र सिंह यांच्यासह १३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून त्यात तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 101 जणांना वाचवण्यात यश आले असून, काही अद्याप बेपत्ता आहे.महेंद्रसिंग हे भारतीय नौदलाचे कुशल कमांडो तर होतेच पण त्यांच्याकडे अष्टपैलू प्रतिभाही होती. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंगने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंदूक वापरण्याचे प्रशिक्षणही दिले होते. त्यांचे योगदान देशसेवेसाठी त्यांचे शौर्य आणि समर्पण दर्शवते. तसेच महेंद्रसिंग यांचे पार्थिव गुरुवारी दुपारपर्यंत त्यांच्या गावी पोहचेल अशी माहिती समोर आली आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.  

Edited By- Dhanashri Naik