मुंबईत बेस्ट बसची ३ वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, वाहकासह सहा जण जखमी; पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले
सोमवारी सकाळी मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनजवळ अनियंत्रित बेस्ट बस पाच वाहनांना धडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहकासह सहा जण जखमी झाले आहे.
सोमवारी सकाळी मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस पाच वाहनांना धडकली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहकासह सहा जण जखमी झाले आहे. हा अपघात दादर रेल्वे स्टेशनजवळ सकाळी घडला.
या परिसरात सहसा प्रचंड वाहतूक आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार, बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि तिने एक दुचाकी, एक इलेक्ट्रिक बाईक, एक इलेक्ट्रिक कार, एक टॅक्सी आणि एक बलेनो कार यांना चिरडले. तसेच अपघातानंतर लगेचच जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर, क्रेनच्या साहाय्याने खराब झालेली वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले होते आणि तिची समोरची काच (विंडस्क्रीन) पूर्णपणे फुटली होती.
Edited By- Dhanashri Naik