मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (20:50 IST)

मुंबईत रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

west railway
मुंबईत रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक दरम्यान विशेष वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या विविध कामांसाठी लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
 
रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत. तसेच, काही लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असुन काही लोकल ट्रेन उशीरा धावणार आहेत.
 
मध्य रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात आला असून, जलद मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत हा मेगाब्लॉकघेण्यात आला आहे. या 5 तासात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.
 
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ-पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. या वेळेत नवी मुंबईतील प्रवाशांना मुख्य हार्बर मार्गावरून प्रवास करता येणार आहे.