बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 18 सप्टेंबर 2025 (08:03 IST)

मुंबई सेंट्रल-वलसाड पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग भीषण आग लागली

Maharashtra News
बुधवारी संध्याकाळी ७:५६ वाजताच्या सुमारास मुंबई सेंट्रल-वलसाड फास्ट पॅसेंजर  ट्रेनच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (इंजिन) मधून अचानक ठिणग्या आणि ज्वाळा दिसू लागल्या. ट्रेन केळवे रोड स्टेशनजवळ असताना ही घटना घडली.
तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून ट्रेनला प्लॅटफॉर्मवर सुरक्षित थांब्यावर आणले. सुदैवाने, या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.
 
सुरक्षिततेसाठी, ओव्हरहेड इलेक्ट्रिक पॉवर (ओएचई) पुरवठा तात्काळ बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे, ज्यामुळे मोठा अपघात टाळता आला. अधिकारी आणि तांत्रिक पथके घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
 
वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि इंजिनची तपासणी केली. रेल्वेने सांगितले की, लवकरात लवकर सामान्य वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक प्रवाशांनी आणि जनतेने रेल्वेच्या त्वरित कारवाईचे कौतुक केले.
Edited By- Dhanashri Naik