1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Mumbai Famous Gaiety Galaxy Theatre Closed

'हनुमान अंश' चित्रपट न लावल्याने मुंबईचे प्रसिद्ध 'गेयटी गॅलेक्सी' थिएटर बंद पडले का? जाणून घ्या नेमके सत्य

मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध 'गेयटी गॅलेक्सी' (G7 मल्टिप्लेक्स) थिएटरमध्ये सोमवारी अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. थिएटरमध्ये 'हनुमान अंश' हा चित्रपट प्रदर्शित न केल्याचा आरोप करत एका राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या 'मिर्झापूर: द मूव्ही' या चित्रपटाचे पोस्टर फाडल्याचाही आरोप आहे. या गोंधळामुळे सोशल मीडियावर असा दावा केला जाऊ लागला की, 'हनुमान अंश' चित्रपट न लावल्यामुळेच हे थिएटर बंद करण्यात आले आहे.
 
मात्र, थिएटर बंद होण्याचे खरे कारण वेगळेच आहे:
परवान्याचा मुद्दा: गोंधळानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, तेव्हा थिएटरचा मनोरंजन परवाना २०२१-२२ नंतर रिन्यू करण्यात आलेला नाही हे उघडकीस आले.
 
पोलिसांची कारवाई: परवाना नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत थिएटरमधील शो थांबवण्याचे आणि थिएटर बंद करण्याचे आदेश दिले.
 
व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण: थिएटर प्रशासनाने तांत्रिक देखभालीचे कारण देत शो काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. थिएटर व्यवस्थापनाने हा बंद तांत्रिक कारणांमुळे म्हणजेच काही केबल जळाल्यामुळे तात्पुरता असल्याचे म्हटले असले, तरी पोलिसांच्या वतीने परवाना नूतनीकरण न झाल्याची अधिकृत नोटीस बाहेर लावण्यात आली आहे. 
पुढील लेख
ओडिशाच्या जंगलात पाच अनोखे ओरंगुटान सापडले, वन विभागाचे रेस्क्यू; हे प्राणी भारतात कसे पोहोचले?