जानेवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार
त्या जानेवारीपासून मुंबई लोकलचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याचा विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हटले आहे. मुंबई लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र उपस्थितीत असतातना अशा परिस्थितीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितले की, “आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असे मला वाटतं.” पुढे ते म्हणाले की, “एकूण घटती रुग्णसंख्या, रुग्ण बरं होण्याचे प्रमाण तसंच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झाले की ट्रेनला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल”.