मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाचवे पिस्तूल जप्त केले
मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त केली असून मुंबई क्राईम ब्रँचने पुण्यातील रुपेश मोहोळच्या घरातून बाब सिद्दीकी हत्या प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त केली आहे. सूत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांनी हरियाणाला पथके पाठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणखी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने पुण्यातील रुपेश मोहोळच्या घरातून बाब सिद्दीकी हत्या प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त केली आहे. रुपेश मोहोळच्या पुण्यातील घरातून मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक पिस्तूल जप्त केले आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी जप्त करण्यात आलेले हे पाचवे शस्त्र असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. या प्रकरणी अजून एक शस्त्र आणि तीन जिवंत काडतुसांचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली शस्त्रे राजस्थानमधून आल्याचे सांगितले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने संशयितांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेर पाच पथके तैनात केली असून हरियाणात या हत्येचा कथित सूत्रधार म्हणून ओळखल्या गेलेल्या झीशानचा शोध पथके सक्रियपणे घेत आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील निर्मल नगर भागात त्यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
या हत्याकांडाची जबाबदारी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नेतृत्वाखालील टोळीने घेतली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक केली आहे.
Edited By- Dhanashri Naik