शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (10:06 IST)

मुंबई पाऊस: मुसळधार पावसामुळे मुबंईत रस्ते आणि रेल्वे रुळांवर गुडघ्यापर्यंत पाणी,पूरसदृश परिस्थिती

Mumbai rains: Knee-deep water on roads and railways in Mumbai due to torrential rains
मुंबईत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मायानगरीचा वेग रोखला आहे. रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे आजूबाजूला सर्वत्र पाण्याचे दर्शन घडत आहे. रस्ते आणि रस्त्यांपासून रेल्वे रुळांपर्यंत पाणी साचले आहे. गुडघ्या पर्यंत पाणी भरले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हनुमान नगर ते कांदिवली परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.सकाळी पाणी घरात शिरल्याने मुंबईकरांना त्रास होत आहे. 
 
मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात रात्रभर पाणी साचले.गांधी मार्केट च्या भागात भीषण जलसाठा झाला असून यामुळे वाहनांच्या हालचालीवर परिणाम झाला. त्याचबरोबर मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याने भरून गेला आहे. सायन परिसरातील मुख्य रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी भरले आहे.आज सकाळी पावसामुळे लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.आजही मुंबईत पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.