सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)

नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सव्वा तासात, सुरु झाली वॉटर टॅक्सी सेवा

water taxi
नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे. बेलापूर ते मांढवा पर्यत वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. आजपासून  सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सी ही सेवा केवळ शनिवार-रविवार सुरु असणार आहे. नयनतारा शिपिंग कंपनीने मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने ही सेवा सुरु केली आहे. याचा लाभ  २१ प्रवास्यांनी घेतला. यासाठी प्रती प्रवासी ३०० रुपये भाडे आकारण्यात आले असून बोटीची प्रवासी क्षमता ही २०० आहे अशी माहिती नयनतारा शिपिंगचे कॅप्टन रोहित सिन्हा यांनी दिली. काही आठवड्यातच  याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच जलमार्गांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवेला परवानगी देणे आहे. अन्य मार्गांचीही चाचपणी सुरु आहे अशी माहिती मेरिटाईम बोर्ड अधिकारी संजय शर्मा यांनी दिली आहे.
 
बेलापूर येथून सकाळी ८ वाजता सदर वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडवा येथे पोहोचेल तर संध्याकाळी ६ वाजता मांडवा येथून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूर जेट्टी येथे पोहोचेल. या सेवेसाठीच्या ऑनलाईन बुकींगला २३ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून सुरुवात झाली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor