शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 25 मे 2021 (18:26 IST)

मुंबई : NCB ने ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केली.

मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटाला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. NCB ने गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड अशा तीन ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त केले. याची किंमत 2 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. 
 
एनसीबी गेल्या काही दिवसांपासून शादाबच्या तपासात होती. हा मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनाही तो ड्रग्ज पुरवठा करायचा. एनसीबीनं महागड्या गाड्या आणि पैसे मोजण्याची मशीनही जप्त केली आहे.
 
शादाब बटाटा मागील बऱ्याच काळापासून ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम करतो. मुंबईमध्ये एमडीएमएशिवाय विदेशातून येणाऱ्या एलएसजी, गांजा, कोकीन यासारख्या ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा बटाटावाला करत होता.