1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (08:59 IST)

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

NCP leader Chhagan Bhujbal's condition deteriorated
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुजबळ पुण्यात पोहोचले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार भुजबळांना घशाचा त्रास झाला असून ताप आला आहे. छगन भुजबळ हे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुण्यात आले होते. पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.  तसेच त्यांना ताप आणि घशाच्या संसर्गाची तक्रार होती. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची आता प्रकृती स्थिर आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांच्या समर्थकांना करण्यात आले आहे.