Festival Posters

मागण्या मान्य ! परिचारिकांचा संप अखेर मागे

गुरूवार, 2 जून 2022 (11:22 IST)
मुंबई : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांचा संप आज अखेर मागे घेण्यात आला आहे. परिचारिकांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याची घोषणा राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे  यांनी केली.
 
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि परिचारिकांचे शिष्टमंडळ यांच्यात मंगळवारी सकारात्मक चर्चा झाल्याने आज संप मागे घेतला आहे. राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे यांनी संप मागे घेण्याबाबत अधिकृत घोषणा केली. तर, पुढील कार्यवाहीसाठी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश अमित देशमुख यांनी दिले आहेत, असी माहितीही मनीषा शिंदे यांनी दिली.
 
परिचारिकांची विनंती आधारित बदली करण्यासह पदभरती, पदोन्नती इत्यादी बऱ्याच काळापासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यभरातील हजारो परिचारिका बेमुदत संपावर गेल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय, जी टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला. शिवाय, अनेक शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या होत्या.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या भरघोस संधी मिळतील

योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीचा वापर; पत्ताकोबी लागवडीची संपूर्ण माहिती

ITR Filing 2026: ३१ जुलैपर्यंत तुमचा रिटर्न दाखल न केल्यास ₹५,००० पर्यंत दंड होऊ शकतो

कामातील गंभीर अनियमितता आणि निष्काळजीपणानंतर एसटी महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू; बीएमसीचे चार अधिकारी निलंबित, नुकसान भरपाई जाहीर

पुढील लेख
Show comments