शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (10:52 IST)

महाराष्ट्रात परत एकदा हिट अँड रन प्रकरण, पालघरमध्ये स्कॉर्पिओने दुचाकीस्वाराला चिरडले

Maharashtra News
महाराष्ट्रातून परत एकदा एक हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वाराला चिरडले.
 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना घडतांना दिसत आहे. तसेच पालघर मनोरमधून हिट अँड रनचे नवे प्रकरण समोर आले आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वाराला धडक दिली, यात एकाचा मृत्यू झाला.
 
या भीषण अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार झाला. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. रात्री एक वाजता हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. पण सकाळपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने व आरोपी पळून गेल्याने संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच कुटुंबीय म्हणाले की, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. चालकाचा शोध पोलीस घेत आहे.