शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (12:31 IST)

राज्यात प्रीकोविड रजिस्ट्री करण्यात येणार

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार या तिन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महिला आणि बालकांसाठी Pre Covid Registry (प्री- कोव्हिड रजिस्ट्री) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संक्रमणाशी संबंधित महिलांच्या गरोदरपणाच्या काळात तसेच मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीसाठी निवारणासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. विशेषतः गरोदर महिलांसाठीची अशी ही रजिस्ट्री असणार आहे. या रजिस्ट्रीच्या माध्यमातून SARS CoV-2 चा गरोदर महिलांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. तसेच बाळांत महिला आणि नव्याने जन्माला येणाऱ्या बालकांवर कोरोनाचा नेमका काय परिणाम होतो हेदेखील अभ्यासण्यात येणार आहे.
 
जून २०२१ च्या आकडेवारीनुसार जवळपास ५५२४ गरोदर महिलांची आणि बाळांत महिलांची देशभरात नोंद ही प्री कोविड रजिस्ट्रीमध्ये झालेली आहे. एकुण २१ वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालये ही या अभ्यासाचा भाग आहेत. या अभ्यासामध्ये महिलेकडून बाळाला होणारा कोरोनाचा संसर्ग हाच मुख्य अभ्यासाचा विषय होता. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकांमधील कोरोनाच्या संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी सरशी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणजे प्रीकोविड रजिस्ट्री तयार करणे हा एक भाग आहे.