विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री वाढली. याच मैत्रीतून पुढे प्रेमाच्या भावनेतून तरुणीच्या आलेल्या मिस कॉलला ग्रीन सिग्नल समजून तरुणाने भावासोबत विवाहितेचे घर गाठले. मात्र, तिने गैरसमज झाल्याचे सांगून जाण्यास सांगितले. तेव्हा तरुणाने चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. तर त्याच्या भावाने बलात्काराचे व्हिडिओ केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जवळपास 200 हून अधिक सीसीटीव्ही तपासत अटकेची करवाई केली आहे. अनिल चव्हाण (19) आणि नीलेश चव्हाण (20) विलेपार्ले येथील रहिवासी आहे.
धारावी परिसरात तक्रारदार 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहण्यास आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास चव्हाण भावांनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एकाने या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले