गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (21:12 IST)

राऊत यांचा हा फ्लॉप शो : मोहित कंबोज

Raut's flop show: Mohit Kamboj राऊत यांचा हा फ्लॉप शो :  मोहित कंबोजMumbai Marathi News In Webdunia Marathi
राऊत यांचा हा फ्लॉप शो असल्याची टीका मुंबई भाजप युवा शाखेचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी केलीय.  तसेच, जी चौकशी करायची असेल ती खुशाल करा असं आव्हानही त्यांनी दिलंय. प्रवीण राऊत यानं नायगाव, वसईत, संजय राऊतच्या ताकदीवर 175 एकर जमीन विकली. अँटी करप्शनने कोणतीही चौकशी केली नाही. 1500 कोटीला जमीन विकली यात संजय राऊत यांनी किती पैसे मिळाले? असा सवाल त्यांनी केला.
 
दाऊद, छोटा शकील, पारकर यांच्याशी संबंधित छाप्यांशी राऊत यांचा संबंध काय? त्यांनी जे बॉम्ब ब्लास्ट केले त्यांच्याशी राऊत यांचा संबंध काय? कोविड सेंटरचा घोटाळा, पाटकर यांच्याशी त्यांचे संबंध काय याचा त्यांनी खुलासा करावा.
 
संजय राऊत माझ्याकडे प्रत्येक वर्षी गणपतीला येतात. आर्थिक अडचणीत आम्ही एकमेकांना मदत केली आहे. पण, त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. खोटे आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. राज्य सरकार माझ्याशी संघर्ष करत आहे. त्यांना जी चौकशी करायची असेल ती यांनी करावी असं खुलं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.