गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (12:48 IST)

करोडोची फसवणूक करणाऱ्या रिअल लाईफच्या बंटी -बबलीला अटक

Real life bunty-bubbly arrested for defrauding crores करोडोची फसवणूक करणाऱ्या रिअल लाईफच्या बंटी -बबलीला अटक Marathi Mumbai News In Webdunai Marathi
सोनाच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील डझनभर लोकांची फसवणूक करून पसार झालेल्या रिअल लाईफ बंटी बबलीला मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी अटक केली. पिंकी दमानिया आणि जिग्नेश दमानिया असे या दाम्पत्याचे नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या जवळून लाखोंचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 

हे दोघे पती -पत्नी असून यांनी तक्रारदारांची तब्बल 35 लाखांची फसवणूक केली आहे. हे दोघे स्वतःला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे व्यापारी असल्याचे सांगून लोकांना सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायला लावायचे आणि सोन्याच्या दागिन्यांचे कॅरेट मध्ये बदलून बाजारभावात विकत असे. या पूर्वी देखील या दोघांना 2015 मध्ये आर्थिक फसवणुकीत आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. नंतर या दोघांची जमिनीवर सुटका झाली. सध्या हे दाम्पत्य तुरुंगात आहे.