गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (08:05 IST)

मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,पुण्याला ऑरेंज अलर्ट

Red alert for four districts including Mumbai
मुंबईसह चार जिल्ह्यांना  पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. तसेच, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
 
मुंबई,ठाणे आणि पालघरसाठी 19 जुलै ते 22 जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे. तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांसाठी 19 जुलैसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर 20 जुलैपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
येत्या 24 तासांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यासोबतच काही भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहतील अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई तसेच परिसरासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठीही 18 जुलैचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.