गुरूवार, 6 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2025 (15:39 IST)

धाराशिवात शिवसेना यूबीटीला मोठा धक्का लागणार,प्रताप सरनाईकांचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळाला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यूबीटी पक्षाची कामगिरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत निराशाजनक होती. त्याचे दुष्परिणाम आता महाराष्ट्र राजकारणात देखील दिसून येत आहे. आता शिवसेना यूबीटी मध्ये ऑपरेशन टाइगर सुरु होण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे नेते धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.  
धाराशिवात शिवसेना यूबीटी ला मोठा धक्का लागणार असा दावा त्यांनी केला आहे. यूबीटीचे खासदार, आमदार, डीसीएम हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.यूबीटीचे अनेक खासदार आणि आमदार पक्ष सोडून शिंदे गटात शामिल होण्याच्या तयारीत असल्याचे असेच विधान धाराशिवचे नवनियुक्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत केले.
 
भविष्यात या जिल्ह्य़ात अनेक अनपेक्षित बदल पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात काही बदल झाला तर आश्चर्य वाटायला नको. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत आहोत. खरी शिवसेना कोणाची, हे या राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. सर्वसामान्यांना कळले आहे की खरी शिवसेना कोणाची? त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातही काही बदल झाला तर आश्चर्य वाटायला नको.
Edited By - Priya Dixit