निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा -जयंत पाटील

jayant patil
Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (20:42 IST)
निरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.
धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबात विधानभवनात बैठकीत जयंत पाटील बोलत होते.यावेळी जयंत पाटील यांनी प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधिल असतो आणि तो त्यांचा हक्कही आहे.
त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाली असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही दिले.

त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशाची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असेही जयंत पाटील म्हणाले.१९९९ पासून देवघर निरा प्रकल्पातील ३०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांना अद्याप आमच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाही. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून त्यावर तोडगा काढून आम्हाला हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आनंदा डेरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्था निरा देवघरचे सचिव प्रकाश साळेकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे, संघटक संजय माने व लक्ष्मण पावगी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

बीडमध्ये महिलांचं भाकरी थापून अनोखं आंदोलन

बीडमध्ये महिलांचं भाकरी थापून अनोखं आंदोलन
एसटीचा संप चिघळला असला तरी काही ठिकाणी अजूनही संप सुरूच आहे. बीडमध्ये संप सुरू ठेवत ...

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ...

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली
महाराष्ट्र सरकारने आज नव्याने निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...