कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, शिवसेना आमदाराचे प्रताप

kachara safai
मुंबई| Last Modified सोमवार, 14 जून 2021 (14:29 IST)
मुंबई पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे ‘तुंबई’ बनली. या दमदार पावसामुळे मुंबईमधली नालेसफाईचे बिंग फुटले असून, संपूर्ण नालेसफाई झाली असल्याच्या मुंबई महापालिकेच्या दाव्याला देखील याने हरताळ फसला गेला आहे. त्यामुळे, विरोधकांनी महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.

यातच मुंबईमधील कुर्ला परिसरात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी एक घृणास्पद कृत्य केले असून, एका कंत्राटदाराला त्यांनी चक्क कचऱ्याने अंघोळ घातलेली आहे. याचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवरून प्रचंड व्हायरल होत असून, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतापून त्यांनी या ठेकेदाराला नाल्याजवळ बसवून त्याला कचऱ्याने अंघोळ घातली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वच स्तरांवर उमटले असून, शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी देखील या घटनेची निंदा केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर लांडे यांना विचारणा केली असता, “ज्या लोकांनी मला विश्वासाने मला निवडलंया आहे. त्यांचा मी विश्वासघात करू शकत नाही. माझ्या भागात पाणी अशा प्रकारे जर पाणी तुंबले, तर मी स्वत: गटारात उतरुन काम करेन. मात्र, लोकांना कुठला त्रास नको यासाठी मी आणि पक्षातील काही कार्यकर्ते हे काम करत आहोत,” असं सांगत तयांनी या कृत्याचं समर्थ केलं आहे.


यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमध्ये ‘शिवलिंग’ सापडल्याच्या ...

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमध्ये ‘शिवलिंग’ सापडल्याच्या दाव्यावर अधिकारी म्हणतात...
अनंत झणाणे काशीतल्या ज्ञानवापी मशिदीतलं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. कोर्टानं नेमलेल्या ...

PUBG News: पब्जी खेलते हुए दूसरी मंजिल से गिरा युवक, ...

PUBG News: पब्जी खेलते हुए दूसरी मंजिल से गिरा युवक, महाराष्ट्र के पालघर में इलाज शुरू
PUBG गेमबाबत अनेक धोकादायक किस्से ऐकायला मिळतात. ज्यामध्ये या किलर गेममुळे अनेक लहान मुले ...

BGMI मध्ये आले नवीन फीचर्स

BGMI मध्ये आले नवीन फीचर्स
बॅटलग्राउंड मोबाइल रिडीम कूपन कोड या वेबसाइटवरून तपासले आणि कॉपी केले जाऊ शकतात. ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले म्हणाले….
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार का, यासंदर्भात ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पीर बाबा दर्ग्याच्या ग्रीलच्या दरवाजाला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची ...