रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (16:27 IST)

पत्नीची हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

death
महाराष्ट्रातील वाशीम येथे चारित्र्याचा संशयावरून एका पतीने जंगलात नेऊन पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विलास लिंबाजी सुर्वे आणि उषा सुर्वे असे या मयत पतिपत्नीचे नाव आहे. 

सदर घटना वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी गावातील आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर एका व्यक्तीला संशय होता. पत्नीचे संबंध एका दुसऱ्या पुरुषाशी असल्याचा संशय या विलास ला होता.या कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. 

घटनेच्या दिवशी देखील दोघात भांडण झाले आणि पत्नी शेतावर काम करायला गेली. काही वेळा नंतर पती तिथे आला आणि चल आपण जंगलात जाऊन फोटो काढू असे म्हणाला. पत्नी तयार झाली आणि दोघे जवळच्या जंगलात गेले. तिथे विकासने  पत्नी उषाच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली आणि पसार झाला. 

महिलेचा मृतदेह जंगलात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून रिसोड पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि पंचनामा केला.मृतदेह ताब्यात घेतले. तसेच त्यांना विलासने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या दाम्पत्याला दोन अपत्य एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
  
Edited by - Priya Dixit