1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:24 IST)

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 29 एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असता राणा दाम्पत्यानं याविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितलीय. राणा दाम्पत्याच्या याचिकेवर आज सुनावणी झाली असता सत्र न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. 29 तारखेपर्यंत राणा दाम्पत्य हे कारागृहातच राहणार आहेत. त्यांना सत्र न्यायालयाकडूनही कोणताही दिलासा मिळालेला नाही.
 
दंडाधिकारी न्यायालयात त्यांची जामीन याचिका प्रलंबित आहे. लीगल प्रोसिडिंग न करता राणा दाम्पत्य सत्र न्यायालयात अर्ज केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. 29 एप्रिलला या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे. उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला तीन दिवसांचा अवधी देण्यात आला असून, ठाकरे सरकारला सत्र न्यायालयानं अर्जासंबंधी उत्तर देण्यास सांगितलं आहे.