शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (09:20 IST)

मुंबईवर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे

(NIA) एक अज्ञात ईमेल आला असून त्यात मुंबईवर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. तालिबानी असल्याचा दावा करत एकाने मुंबईवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या ईमेलनंतर सर्व यंत्रणा अलर्टवर आल्या असून NIA नं याबाबत मुंबई पोलिसांना सूचना दिली आहे. महाराष्ट्रात विविध शहरात सुरक्षा वाढवण्यात आली असून ईमेलमध्ये संबंधिताने स्वत:ला तालिबानी म्हटलं आहे.
 
धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सत्य शोधण्यासाठी मुंबई पोलिसांसह एनआयएने संयुक्त तपास सुरू केला आहे. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा फोन आला होता ज्यामध्ये एका अज्ञात कॉलरने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४.३० वाजता शाळेच्या लँडलाईनवर कॉल आला. कॉल करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारचा फोन शहरातील विविध भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांना एका अनोळखी कॉलरचा 'संशयास्पद' कॉल आला ज्याने त्यांना माहिती दिली की शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरने दावा केला की, शहरातील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. अज्ञात व्यक्तीला पकडलं होतं.

Edited by: Ratnadeep Ranshoor