मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!
मुंबईत ऑटो टॅक्सी नंतर आता बेस्ट बसचे भाडे वाढण्याची तयारी केली जात आहे. असं करणे मुंबईकरांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या साठी कंपनीच्या सीईओने तोट्याचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली.
देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोची किंमत वाढल्यानन्तर आता बेस्ट बसचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. बेस्ट बस ही मुंबईतील दुसरी सर्वात मोठी जीवनरेखा मानली जाते. लोकल नंतर लाखो मुंबईकर बेस्ट बस ने प्रवास करतात.
बेस्ट बस मुंबईच्या रस्त्यांवर एसी आणि नॉन एसी धावतात. सध्या नॉनएसीच्या भाड्यात पाच रुपयांनी वाढ करण्याची योजना आहे. तर एसीचे भाडे सहा रुपयांनी वाढवण्याची तयारी केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या सीईओ ने अनेक वर्षांपासून तोट्यात चालणाऱ्या बेस्ट बसचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या मध्ये बेस्ट बसचे भाडे वाढवण्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असे ठरले आहे. सध्या बेस्ट बस दररोज 2 कोटीं रुपयांचे उत्पन्न मिळवतात आणि भाडे वाढवल्यानंतर हे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit