शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (11:33 IST)

मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना भरधाव कारने चिरडले, एकाचा मृत्यू

गणपती बाप्पाचे आगमन आज घरोघरी आणि मंडळात होत असताना मुंबईतून एक हृदयविदारक घटना समोर आली आहे. मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना भरधाव वेगाने धावणाऱ्या बीएमडब्ल्यूने जोरदार धडक दिली. या अपघात एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना पहाटे 4 वाजता घडली आहे. या घटनेनंतर वाहनचालक पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

सदर घटना मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत असताना भरधाव धावणाऱ्या बीएमडब्ल्यूने चिरडले. या अपघातात प्रीतम नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर प्रसाद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

या घटनेनन्तर वाहन चालक पसार झाला.पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. 
Edited by - Priya Dixit