मुंबई : दादर प्लाझा सिनेमाजवळ अनियंत्रित बेस्ट इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना चिरडले; २ जणांचा मृत्यू
मुंबईतील दादर प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट इलेक्ट्रिक बस क्रमांक ४६३ च्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता भरधाव वेगाने जाणारी बेस्ट इलेक्ट्रिक बसने अनेक कार आणि दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, एक दुचाकी बसच्या जड चाकांखाली पूर्णपणे चिरडली गेली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या दादर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हाती घेतली आणि सर्व १२ ते १३ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: यवतमाळमध्ये शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन, जितेश नवाडे आणि साहेबराव कांबळे शिंदे गटात सामील झाले
Edited By- Dhanashri Naik
