मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (09:03 IST)

व्हिडिओ रेकॉर्ड करुन महिलेने केली आत्महत्या, परिसरात प्रचंड खळबळ

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करुन हा व्हिडिओ मैत्रिणींना पाठवल्याचे समोर आले आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. प्रिती शिवकुमार जैयस्वाल (वय-35) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पिडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला. व्हिडिओ रेकॉर्ड करुन विवाहित महिलेने आत्महत्या केली हे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.
 
विवाहितेने मैत्रिणींना पाठवलेल्या व्हिडिओत पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले,याचाही उल्लेख तिने केला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत चौकशी करून यामध्ये असलेल्या दोषी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले आहे. मयत प्रितीने व्हिडिओत म्हटले आहे की, तिच्या आजाराकडे दुर्लक्ष करताना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने म्हटले आहे.तसेच सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत.त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचा वापर करण्यात मनाई केली.आपण उचलत असेलल्या या टोकाच्या पवालाबद्दल स्वत:च्या आई वडिलांची माफीही या संदेशात तिने मागितली आहे.