शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2024 (13:16 IST)

आज मुंबई मध्ये 'येलो अलर्ट'

मागील 17 दिवसांनापासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु आहे. मुंबईकरांना येणार जाणारा पावसाचा सामना करावा लागत आहे. आज गुरुवारी मुंबई मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज हवामान विभागाने मुंबईमध्ये 'येलो अलर्ट' घोषित केला आहे. तसेच कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
यावर्षी पहिला  पाऊस मुंबईमध्ये 9 जून ला दाखल झाला. पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. त्यांनतर कमी कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत होता. पण आज हवामान विभागाने अलर्ट घोषित केला आहे. भयंकर उष्णतेमुळे मुंबईकरांना गर्मीचा सामना करावा लागत होता. पण यानंतर आता आज 'येलो अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.