जामीन घेणार नाही- राज ठाकरे
सरकारला जे करायचे ते त्यांनी करावे, मला जे करायचे ते मी करेन असे आपल्या पत्रकार परिषदेत ठासून सांगत, आपल्याला सरकारने खुशाल अटक करावी,अटक झाल्यानंतर जामीन घेणार नसल्याची भूमिका राज यांनी घेतल्याचे समजते.असे झाल्यास हे प्रकरण चिघळण्याची भिती पोलिसांना वाटते आहे.चिथापनीखोर वक्तव्य आणि साजात द्वेष निर्माण करण्याचा आरोप पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.