मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विद्यार्थ्यांनी जात आणि धर्म लिहिलेलाच नाही

केरळमध्ये यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपली जात आणि धर्म लिहिलेलाच नाही. विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना १ लाख, २३ हजार ५३० विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म जाहीर करायला आणि नोंदवायला नकार दिलाय. विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे हे विद्यार्थी आहेत. 
 
जात किंवा धर्म जाहीर करण्याची आमची इच्छा नाही, असं सांगत एक लाखाच्यावर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी 'जात' आणि 'धर्म' हा रकाना कोराच ठेवलाय. केरळचे शिक्षणमंत्री सी रवींद्रनाथ यांनी केरळच्या विधानसभेत ही माहिती दिलीय.
 
या निमित्तानं केरळमध्ये हा एक प्रकारचा विक्रमच झालाय. ही संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेताना जात किंवा धर्म लिहिणं बंधनकारक नाही.