1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: आनंद , बुधवार, 16 जून 2021 (10:29 IST)

गुजरातमधील आनंद येथे ट्रक आणि कारच्या धडकेत 10 ठार

गुजरातमधील आनंद जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या तारापूर भागात ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. त्यात दहा लोकांचा जागीच मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील लोक इको कारमध्ये प्रवास करत होते. गाडी सुरतहून भावनगरकडे जात होती. आनंद जिल्ह्यातील तारापूर भागातील इंद्रनाज गावाजवळ समोरून येणार्या एका ट्रकने महामार्गावर धडक दिली. ट्रकवर मध्य प्रदेश नंबर प्लेट असल्याची बाब समोर येत आहे.
 
दोन्ही वाहने वेगात असल्याने टक्कर अतिशय वेगाने झाली. कार समोरून ट्रकमध्ये धडकली. कारमधले सर्वजण जागीच मरण पावले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सर्व मृतदेह वाहनातच एकमेकांवर पडले होते.