1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. 2 killed and 1 injured as car falls into river in Rajasthan

कार नदीत पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू तर एक जखमी

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उदयपूर-बंसवाडा राज्य महामार्गावरील चिडिया वसा गावाजवळ हा अपघात घडला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मित्र बांसवाडाहून साबळा येथील त्यांच्या घरी जात असताना त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि पुलावरून खाली नदीत पडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.  
 
अपघातानंतर स्थानिक नागरिक पोलिसांना तातडीने सूचना दिल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पाण्यात उतरून कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले. तिन्ही तरुणांचा श्वासोच्छवास सुरू होता, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
अमित शाह म्हणाले-मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल