1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:41 IST)

ही केवळ केवळ अफवाच

2000 note
दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलं आहे. असा प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका असं ते म्हणाले.  राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान काँग्रेस खासदार मधुसूदन मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 2 हजारांची नोट चलनातून रद्द करण्याच्या अफवा आहेत, दोन हजारांची नवी नोट चलनातून रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं.