सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (12:55 IST)

आज होणार शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये जमा

आज, 28 फेब्रुवारी, दुपारी 4 वाजता पीएम-किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता जारी करतील. 16व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली आहे की नाही हे तपासण्यासाठी, कृपया तुमचे बँक खाते विवरण तपासा. त्याच वेळी, लाभार्थी यादीत नाव असूनही, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत, तर तुम्ही अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.पीएम किसान योजनेंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी पाठवला जातो.

पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचा खात्यावर 2000 रुपये पाठवले जाणार. मोदी सरकार दरवर्षी 6000 रुपये बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर करते. हे पैसे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन हफ्त्यांमध्ये मिळतात. आज शेतकऱ्यांना 16 वा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे इकेवायसी पूर्ण होणे अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता यवतमाळ, महाराष्ट्र येथून आज म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी जारी करणार आहेत. पीएम मोदी संध्याकाळी 4 वाजता 16 वा हप्ता जारी करतील. हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले जातील.
 
यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
 त्याच्या होमपेजच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
 फार्मर्स कॉर्नर विभागात तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
 यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
 
 Edited by - Priya Dixit