पोटात निघाले 250 खिळे, 35 नाणी, शस्त्रक्रिया करताना डॉक्टर थक्क

Nails
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (11:48 IST)
पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पोटातून 250 खिळे, 35 नाणी आणि स्टोन चिप्स सापडल्याने डॉक्टरही चक्रावून गेले. रिपोर्ट्सनुसार एक मतिमंद व्यक्ती गेल्या पंधरा वर्षांपासून ही खिळे खात होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही खिळे काढली आहेत.

ही बाब वर्धमान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची असल्याचे सांगितले जात आहे. मतिमंद व्यक्तीच्या पोटातून 250 खिळे आणि 35 नाणी जप्त करण्यात आली आहेत. सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख मोईनुद्दीन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मंगलकोट भागातील रहिवासी आहे.

गेल्या शनिवारपासून मोईनुद्दीनने खाणे बंद केले होते. पोटात असह्य वेदना झाल्याने त्यांना वर्धमान येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी त्याचा एक्स-रे केला असता त्याच्या पोटात खिळे असल्याचे आढळून आले.
शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी मोईनुद्दीनला वर्धमान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले.

तेथे रुग्णालय प्रशासनाने त्याच्या शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक तयार केले. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 250 खिळे, 35 नाणी आणि अनेक दगड काढले.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे आणि 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे कौतुक केले
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून ...

तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार ...

मोहम्मद झुबैर यांना जामीन नाही; 14 दिवसांची न्यायालयीन

मोहम्मद झुबैर यांना जामीन नाही; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांची जामिनासाठीची याचिका दिल्लीस्थित पटियाळा ...

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले
केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत ...

मणिपूर भूस्खलन: मृतांची संख्या 25 वर, 38 अद्याप बेपत्ता

मणिपूर भूस्खलन: मृतांची संख्या 25 वर, 38 अद्याप बेपत्ता
गुवाहाटी- मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात शनिवारी ...