सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (19:40 IST)

श्रीनगर एन्काउंटर: श्रीनगर चकमकीत तीन टीआरएफ दहशतवादी ठार

बुधवारी संध्याकाळी श्रीनगरच्या रामबाग भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन टीआरएफ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. तिसऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पोलिसांना तीन दहशतवादी रामबाग परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीवर कारवाई करत पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या पथकासह परिसरात कारवाई सुरू केली. यावेळी पथक शोध घेत असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली, मात्र दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरूच होता. त्यानंतर या बाजूनेही गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंनी बराच वेळ चकमक सुरू होती. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
 
कारवाईदरम्यान, गोळीबारात नागरिक अडकू नयेत म्हणून लोकांची ये-जा बंद करण्यात आली होती. तिघांचेही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांची बासित आणि मेहराज अशी नावे आहेत. हे तिघेही हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यापूर्वीच तिघे ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे कोणतेही नुकसान झाले नाही.
या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे काश्मीरचे आयजी म्हणाले.