सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (16:23 IST)

माकडाने केली एका माणसाची हत्या ! नेमकं काय घडलं जाणून घ्या

दिल्लीच्या नबी करीम परिसरात माकडांच्या दहशतीमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. पाण्याच्या टाकीचे झाकण दाबण्यासाठी घराच्या छतावर ठेवलेली वीट रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर पडली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वीट एका माणसाने नव्हे तर एका माकडाने फेकली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय मोहम्मद कुर्बान परिसरात कुटुंबासोबत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी हमीदा खातून आणि 10 वर्षाखालील पाच मुले आहेत. ते स्कूल बॅग बनवण्याचं कार्य करत होते. सोमवारी संध्याकाळी ते किला कदम परिसरातील गल्लीतून जात होते. या दरम्यान त्याच्या डोक्यावर एक वीट पडली. ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती रुग्णालयातूनच पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी म्हणाले की, ओम प्रकाश यांचे घर किल्ला कदम परिसरात आहे. त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. टाकीचे झाकण दाबण्यासाठी दोन विटा ठेवण्यात आल्या होत्या.
 
अपघाताच्या वेळी जेव्हा माकडाने पाणी पिण्यासाठी झाकण उचलले तेव्हा वीट रस्त्याच्या दिशेने पडली. या दरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या कुर्बानच्या डोक्याला वीट लागली. या प्रकरणी ओम प्रकाशविरोधात निष्काळजीपणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. कुर्बानचे नातेवाईक अशफाक यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी कुर्बान पिशव्या बनवण्यासाठी माल गोळा करण्यासाठी गेला होता.