गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (10:57 IST)

बेंगळुरू इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बेंगळुरूमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली. तसेच हा अपघात झाला तेव्हा इमारतीत अनेक मजूर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 5 वर पोहोचली असून मुसळधार पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये कोसळलेल्या बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले होते. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत 13 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ज्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या बाबुसापल्या येथे मुसळधार पावसात मंगळवारी बांधकाम सुरू असलेली 7 मजली इमारत कोसळली. शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडल्याचे अधिकारींनी सांगितले. आपत्कालीन विभागाची दोन बचाव वाहने मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली असून मुसळधार पावसानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अपघाताबाबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik