शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मतदान करा, हॉटेलमध्ये ५ टक्के सवलत मिळवा

महापालिका निवडणुकीचे औचित्य साधत आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नामी शक्कल लढवत हॉटेल्स संघटनांना दिमतीला घेतले आहे. यात मतदान करून जो मतदार हॉटेल्समध्ये खानपानासाठी येईल, त्याला संबंधित हॉटेल्स चालकांकडून किमान ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या संकल्पनेला ‘आहार’ने ‘समथिंग एक्स्ट्रा’ असे संबोधले आहे. १० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 
 
मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या सार्वजनिक सुट्टीचा गैरवापर करत, अनेक जण आदल्या दिवशीच्या रात्री बाहेरगावी मनोरंजनासाठी शहराबाहेर पडतात. परिणामी, मतदानादिवशी कमी मतदान होते आणि मतदानाची टक्केवारी घसरते. यावर उपाय म्हणून मतदान जागृतीपासून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्याचा फार काही परिणाम दिसून आला नाही. परिणामी, आयोगाने आता ‘आहार’ या हॉटेल संघटनेला मदतीला घेतले आहे.