Festival Posters

राजधानीत इमारत कोसळली, 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Updated: सोमवार, 7 सप्टेंबर 2026 (10:59 IST)
नैऋत्य दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळून जखमी झालेल्या दहा जणांना जेपीएन एपेक्स ट्रॉमा सेंटर (एम्स) मध्ये आणण्यात आले. या १० रुग्णांपैकी पाच जणांना मृत अवस्थेत आणण्यात आले होते, तर गंभीर अवस्थेतील एका रुग्णाचा नंतर मृत्यू झाला. तीन रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एका रुग्णावर अवयव शस्त्रक्रिया करण्यात आली. एका रुग्णाला किरकोळ दुखापत झाली असून निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.
ALSO READ: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २९०० मोफत बसेस, शिंदेंनी दाखवला हिरवा सिग्नल
अपघाताच्या वेळी इमारतीच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरू होते. ही इमारत अंदाजे ४०-५० वर्षे जुनी होती आणि तिचा वापर पीजी (पेइंग गेस्ट) म्हणून केला जात होता. एनडीआरएफ, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि इतर संस्थांची पथके घटनास्थळावरून प्रचंड ढिगारा हटवण्याचे काम करत आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता घटनास्थळी दाखल
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सत्य निकेतन येथील इमारत कोसळलेल्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. यावेळी दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा, एमसीडी आयुक्त संजीव खिरवार, भाजप आमदार अनिल शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित आहे.
ALSO READ: नवी मुंबईत पोलिसाची आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments