बुधवार, 12 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (12:36 IST)

आयुष्मान योजनेअंतर्गत ५४९ रुग्णालये निलंबित, योजनेतील फसवणुकीबाबत एक मोठा खुलासा

Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat Scheme news:आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील विविध राज्यांमधून आलेले ५६२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दावे बनावट असल्याचे समोर आले. याशिवाय, सरकारने फसवणुकीत सहभागी असलेल्या १,११४ रुग्णालयांना पॅनेलमधून काढून टाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या आयुष्मान भारत योजनेतील फसवणुकीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. सरकारने राज्यसभेत सांगितले की, राष्ट्रीय फसवणूक विरोधी युनिटने केलेल्या तपासणीत, खाजगी रुग्णालयांनी केलेले ५६२ कोटी रुपयांचे २.७ लाख दावे बनावट असल्याचे आढळून आले. तसेच राज्य आरोग्य संस्था नियमित डेस्क मेडिकल ऑडिट तसेच फील्ड ऑडिट करतात. यामध्ये १ हजार ११४ रुग्णालयांना पॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५४९ रुग्णालये निलंबित करण्यात आली आहे.
राज्यसभेत सरकारने ही माहिती दिली आहे. आयुष्मान योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांनी बनावट बिल बनवल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत का? बनावट बिले बनवणाऱ्या रुग्णालयांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे? सरकारने सांगितले की, आयुष्मान योजनेअंतर्गत, देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १२.३७ कोटी कुटुंबांमधील सुमारे ५५ कोटी लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच दिले जाते. वय वंदना कार्ड अंतर्गत अलीकडेच ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

या राज्यांमध्ये इतक्या रुपयांच्या नोटा बनावट  
या योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे सरकारने सांगितले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने यासाठी राष्ट्रीय फसवणूक विरोधी युनिटची स्थापना केली आहे. फसवणूक विरोधी पथकाला ६.५० कोटी दाव्यांपैकी ५६२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे २.७ लाख दावे बनावट असल्याचे आढळले आहे. उत्तर प्रदेशात १३.९० कोटी रुपये, पंजाबमध्ये २.८७ कोटी रुपये, उत्तराखंडमध्ये १.५७ कोटी रुपये, मध्य प्रदेशात ११.९३ कोटी रुपये आणि छत्तीसगडमध्ये १२ कोटी रुपयांच्या बिला बनावट असल्याचे आढळून आले.

Edited By- Dhanashri Naik