शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (11:41 IST)

मिरवणुकीत विजेचा शॉक लागून 6 जणांचा दुर्देवी मृत्यू

A major accident occurred during the Barafat procession in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात बराफतच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली.मिरवणुकीत हाय व्होल्टेज करंट लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.सीएम योगी यांनी डीएम आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नानपारा भागातील मासुकपूर येथे हाय टेंशन वायर तुटून मिरवणुकीत पुढे असणाऱ्या  डीजेवर पडली आणि विजेचा प्रवाह होऊन विजेचा धक्का लागून गावातील अश्रफ अली (24),अरफत(8), इलियास(18)शफिक(14), आणि सुफियान(18) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तबरेझ सह चार जण गंभीर होरपळले असून उपचारा दरम्यान तरबेजचा मृत्यू झाला. आणि इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
हे हाईटेंशन वायर लोम्बकळत असून त्याला दुरुस्त करण्यासाठी सांगण्यात आले होते. 
Edited By - Priya Dixit