रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (10:41 IST)

ग्वाल्हेरमध्ये वडिलांनी 19 वर्षीय मुलीची गळा आवळून केली हत्या

murder
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीवर दुसऱ्या जातीतील तरुणाशी असलेल्या प्रेमकरणावरून आपल्या मुलीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये  वडिलांनी दुसऱ्या जातीतील तरुणाशी असलेल्या संबंधांवरून झालेल्या भांडणानंतर आपल्या मुलीची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिकारींनी सांगितले की, ही हत्या गिरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. त्या व्यक्तीच्या मुलीचे दुसऱ्या समाजातील तरुणावर प्रेम होते, परंतु तो आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा याला विरोध होता.
 
शुक्रवारी वडील आणि मुलीमध्ये भांडण झाले, त्यादरम्यान वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik